नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्प येथील लॅमरोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीतील माहिलांचा मध्यरात्री वॉचमनने अश्लील अवस्थेत व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवळाली पोलिसांनी अश्लिल व्हिडिओ काढणा-या वॅाचमला अटक केली असून त्याला न्यायालायने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या वॅाचमनचे नाव नंदलाल टिकाराम डांगी तो २८ वर्षाचा आहे. गेल्या दहा वर्षापासून तो वॅाचमन म्हणून काम करत होता.
डांगी हा रात्रीच्या वेळी सोसायटीमध्ये महिलांचे चित्रीकरण करीत असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणी पीडित महिला आणि साक्षीदार महिलांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरुन देवळाली पोलीसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर वॅाचमनला अटक करुन त्याच्याकडून मोबाईल फोन देखील जप्त केला आहे. या घटनेचा देवळाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या पथकाकडून अधिकचा तपास केला जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून वॉचमनचे आधार कार्ड, फोटो आणि इतर माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन केले आहे.