नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ५५ वर्षीय कैद्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला. शेख मुक्तार शेख गफुर (मुळ रा. वालझरी पिंपळखेड ता.चाळीसगाव) असे मृत कैद्याचे नाव आहे. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओलगाव जि.जळगाव पोलिस ठाणे हद्दीत खून केल्याच्या आरोपात शेख यास शिक्षा लागली होती. जेलमध्ये शिक्षा भोगत असतांना सोमवारी (दि.२६) अचानक त्याच्या प्रकृर्तीत बिघाड झाल्याने कारागृह रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलकंठ ससाणे यांनी तपासणी करून त्यास मृत घोषीत केले. याबाबत जेल कर्मचारी दिपक पंडीत यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक मुन्तोडे करीत आहेत.