नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– प्रियकराने अश्लिल फोटो पतीस पाठवल्यामुळे विवाहित पीडित महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रियकराला अटक केली आहे. पतीस सोडून आपल्यासोबत संसार थाटावा या हेतूने संशयिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पीडीतेचे चाळीसगाव स्थित तरूणाशी प्रेमसंबध होते. कालांतराने दुरावा निर्माण झाल्याने पीडितेने दुस-याशी लग्न केले. ही बाब समजताच संशयिताने पीडितेच्या पतीचा मोबाईल नंबर मिळवित हे कृत्य केले. गेल्या २५ जून ते २७ जुलै दरम्यान संशयिताने पतीला सोडून स्व:ताबरोबर संसार थाटण्यासाठी चाळीसगाव येथे येण्याचा पीडितेकडे आग्रह धरला होता. मात्र पीडितेने नकार देताच संतप्त संशयिताने दोघामधील शरिर संबधाचे फोटो आणि अश्लिल चित्रफित टेलीग्राम अॅपच्या माध्यमातून पीडितेच्या पतीस पाठविले. यावरून दांम्पत्यात खटके उडू लागताच पीडितेने पोलिसात धाव घेतली असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सय्यद करीत आहेत.