नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिलापूर गावात भरधाव दुचाकी घसरल्याने ओढा येथील मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. रमेश दामोधर पेखळे (४६ रा.पेखळे वस्ती,ओढा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पेखळे शनिवारी रात्री शिलापूर येथे गेले होते. आपल्या दुचाकीवरून ते घराकडे परतत असतांना दुचाकी घसरल्याने ते पडले होते. या घटनेत त्यांच्या नाकातून व कानातून रक्तश्राव झाल्याने त्यांना तातडूने अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान डॉ.संजय वेखंडे यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सुनिल गांगुर्डे करीत आहेत.