नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंजमाळ भागात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगवरून पडल्याने २३ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. गणेश मधुकर गहिले (रा.सहकारनगर,भिमवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. गहिले रविवारी सकाळच्या सुमारास आपल्या घराशेजारी नव्याने बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगवर गेला असता ही घटना घडली. अचानक पाय घसरल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक म्हसदे करीत आहेत.