नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – म्हसरूळ येथे प्रियकराच्या मदतीने डॉक्टर पतीला दुस-या पत्नीने भुलीचे इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॅाक्टराने आपल्या मुलाला हा प्रकार सांगितल्यानंतर त्याने पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानंतर म्हसरुळ पोलिस ठाण्यात संशयित महिला व तिच्या प्रियकराविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, १० सप्टेंबर रोजी डॅाक्टरला त्याच्या पत्नीच्या अनैतिक संबधाची कुणकुण लागली होती. त्यामुळे त्यांचा पत्नीशी वाद झाला. या वादानंतर या दोघांनी डॅाक्टरला रुग्णालयातील एका खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर भुलीचे इंजेक्शन देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व प्रकाराची माहिती नंतर डॅाक्टरांनी आपल्या मुलाला सांगितली. त्यानंतर मुलाने पोलिस ठाणे गाठले. येथे रितसर फिर्याद दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेबाबत पोलिस आता सखोल तपास करीत आहेत.