बंद घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम भागात बंद घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप लंपास केले. या चोरीप्रकरणी सुयोग राजेंद्र पांगारकर (मुळ रा.जालना,हल्ली मातृदर्शन सोसा.के.के वाघ कॉलेज जवळ) या युवकाने दिली असून आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयोग पांगारकर आणि पार्थ पांगारकर हे दोघे मातृदर्शन सोसायटीत राहतात. गुरूवारी सकाळी दोघे मित्र घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी नेहमी ठेवत असलेल्या जागेवरून चावी घेत बंद दरवाजा उघडून ३८ हजार रूपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरून नेले. अधिक तपास जमादार गायकवाड करीत आहेत.
अल्पबचत प्रतिनिधीच्या पावती मशिनसह दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार्वाक चौकात अल्पबचत प्रतिनिधीच्या पावती मशिनसह दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन सुरेश पराडकर (रा.माधवस्मृती बंगला,गोदावरी टॉवर शेजारी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पराडकर बँकाचे अल्पबचत प्रतिनिधी आहेत. गेल्या रविवारी (दि.१८) त्यांची ज्युपिटर मोपेड एमएच १५ एफएच ८५०९ बंगल्याच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. या दुचाकीच्या डिक्कीत पिग्मी कंपनीचे कलेक्शन पावती मशिनही होते. अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.