नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदाघाटावरील म्हसोबा महाराज पटांगण भागात पत्ता विचारण्याचा बहाणा करून भामट्यांनी तरूणाशी झटापट करत दोन मोबाईल बळजबरीने काढून घेतले. या घटनेची हिरालाल बाबुलाल कोल (२४ मुळ रा.मध्यप्रदेश, हल्ली विजय स्नेहा अपा.मिरची हॉटेल जवळ औ.बाद रोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल हा परप्रांतीय युवक गुरूवारी गोदाघाटावर गेला होता. सायंकाळच्या सुमारास तो म्हसोबा महाराज पटांगणावरून गाडगे महाराज पुलाच्या दिशेने पायी जात असतांना दोन इसमांनी त्याची वाट अडविली. यावेळी पत्ता विचारण्याचा बहाणा करून संशयितांनी हुज्जत घालत त्याच्याशी झटापट केली. यावेळी एकाने कोल याचे हात पकडून ठेवले तर दुस-याने खिशात हात घालून तपासणी करीत सुमारे १८ हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.