स्पिड ब्रेकरवर कार आदळल्यामुळे अपघात, इनोव्हा कार चालक ठार
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककडून आडगावच्या दिशेने ते प्रवास करतांना स्पिड ब्रेकरवर कार आदळल्यामुळे झालेल्या अपघातात इनोव्हा कार चालक ठार झाल्याची घटना घडली आहे. अरूण कमलेश वाडोदरीया (४० रा.गजानन बंगला,मनोरंजन बार शेजारी,जानोरी शिवार) असे मृत इनोव्हा कारचालकाचे नाव आहे. वाडोदरीया हे गुरूवारी महामार्गाने आपल्या इनोव्हा कारमधून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. नाशिककडून आडगावच्या दिशेने ते प्रवास करीत असतांना महामार्गावरील एका स्पिडब्रेकरवर इनोव्हाचा अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक आहिरे करीत आहेत.
……..
४० वर्षीय महिलेने गळफास लावून घेत केली आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक परिसरातील पंचशिल नगर भागात राहणा-या ४० वर्षीय महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. मंगला रामचंद्र मारणे (रा.अब्दुल किराणा दुकाना शेजारी,पंचशिलनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. मारणे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मारणे यांनी गुरूवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या अँगलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक रायते करीत आहेत.