नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद रोडवरील हनुमानवाडीत सोसायटीचा जिना उतरणा-या बालकाची वाट अडवित एका समोसा विक्रेत्याने विकृत चाळे केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुलगा इमारतीच्या जीन्यातून तळमजल्याकडे जात असतांना समोसा विक्रीसाठी सोसायटीत शिरलेल्या एका अनोळखी इसमाने त्याची जिन्यात वाट अडविली. यावेळी मुलाचे तोंड दाबून त्याने लैंगिक अत्याचार केला. मुलाने कशी बशी सुटका करून घेत माघारी फिरून आपले घर गाठल्याने या घटनेचा उलगडा झाला. मुलाने घरी जावून कुटुंबियाकडे आपबिती कथन केल्याने संशयिताचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तत्पूर्वीच तो पसार झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. एका सोसायटीमध्ये राहणारा अल्पवयीन मुलगा शेजारच्या इमारतीत राहणा-या आपल्या मित्राकडे जात असतांना हा प्रकार घडला. याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.