नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आडगाव पोलिस ठाणे हद्दीती घडली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पहिली घटना महामार्गावरील बिडीकामगार नगर परिसरातील सर्व्हीस रोड भागात घडली. बिडी कामगारनगर येथील बापू पाटील (५०) हे बुधवारी (दि.२१) सर्व्हीसरोडवरील मधुबन हॉटेल परिसरात जखमी अवस्थेत मिळून आले. अॅम्ब्युलन्स चालक सुदाम गायकवाड यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. तर दुस-या घटनेत उंबरखेड ता.निफाड येथील संजय भास्कर थेटे (४५) हे बुधवारी आडगावकडून म्हसरूळच्या दिशेने आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना लिंकरोडवरील निसर्ग हॉटेल परिसरात त्यांच्या कारला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात थेटे यांच्या छाती आणि पायास गंभीर दुखापत झाल्याने नजीकच्या मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंद करण्यात आल्या असून अदिक तपास हवालदार बस्ते आणि जमादार गायकवाड करीत आहेत.