नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाकळीरोड भागात इमारतीच्या जिन्यात पाय घसरून पडल्याने ६७ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यास्मीन शब्बीर मर्चंट (रा.साफिया मंजील,बद्री हॉस्पिटल जवळ) असे मृत वृध्देचे नाव आहे. मर्चट या राहत्या इमारतीच्या दुस-या मजल्यावर जिन्यातून जात असतांना ही घटना घडली. अचानक त्यांचा पाय घसरल्याने त्या पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होवून नाक आणि कानातून रक्तश्राव झाल्याने कुटुंबियांनी त्यांना तात्काळ परिसरातील ९ प्लस रूग्णालयात दाखल केले असता डॉ.दिनेश वाघ यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.