नाशिक : कौटूंबिक वादातून मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरूध्द पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीस अटक करण्यात आली आहे. दिपक पाटील असे अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. चौधरी मळय़ातील प्रोफेसर कॉलनीत राहणा-या पीडित विवाहीतेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पतीने लाकडी दांडक्याने तर सासू आणि नणंदने लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर सास-याने हात पकडून शिवीगाळ आणि दमदाटी करीत विनयभंग केल्याचे म्हटले आहे. गेल्या शनिवारी किरकोळ कारणातून वाद झाला. त्यानंतर हा प्रकार घडला. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.
…
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/