नाशिक : अल्पवयीन मुलीने आपल्या मित्रास घरातील दोन लाखाची रोकड आणि दागिणे देणे तिला महागात पडले आहे. अडचणीचा बहाणा करीत या मित्राने मैत्रीणीस गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अचानक घरातील पैसे व दागिने गायब झाल्याने ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मैत्रीणीस गंडा घालणा-या संशयित तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश संजय शिलावट (२२ रा.नाशिकरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अंबड येथील महालक्ष्मी नगर भागात राहणा-या अल्पवयीन मुलीच्या पित्याने तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि सतरा वर्षीय मुलगी एकमेकांचे परिचीत आहे. गेल्या ऑगष्ट महिन्यात दोघांची भेट झाली होती. या भेटीत संशयिताने मला अडचण असून पैश्यांची गरज असल्याचे मुलीस सांगितले. त्यामुळे मुलीने मदतीचा हात देत त्यास घरातील एक लाख ९८ हजाराची रोकड आणि लाखोंचे दागिणे आपल्या मित्राच्या स्वाधिन केले. अवघ्या काही दिवसातच घरातील रोकड आणि दागिणे गायब झाल्याने सर्वत्र शोधाशोध झाली. मात्र रोकड व दागिणे हाती लागले नाही. पालक पोलिसांकडे जाण्याच्या तयारीत असतांनाच त्यांनी मुलीची चौकशी केली असता या घटनेचा उलगडा झाला. आपल्या मित्रास रोकडसह दागिणे दिल्याचे कळताच मुलीच्या पालकाने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले करीत आहेत.
…….
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/