नाशिक : वडनेर पाथर्डी मार्गावर भरधाव कारने धडक दिल्याने लहानमुलीसह दांम्पत्य जखमी झाल्याची घटना घडली. सदर दांम्पत्य आपल्या मुलीस खेळण्यासाठी गार्डन मध्ये घेवून जात होते. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात पसार झालेल्या कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज अश्पाक खान (रा.समृध्दी अपा.रायबा हॉटेल शेजारी पाथर्डी फाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खान दांम्पत्य गेल्या शुक्रवारी (दि.९) रात्री जेवन आटोपून लहान मुलीस खेळण्यासाठी घराशेजारील गार्डन मध्ये घेवून जात असतांना ही घटना घडली. खान दांम्पत्यासह त्यांची लहान मुलगी वडनेर पाथर्डी मार्गावरील पुजा टेक्सटाईल या दुकानासमोर रस्ता ओलांडत असतांना पाथर्डी गावाकडून भरधाव येणा-या एमएच १५, ५२१४ या कारने तिघांना धडक दिली. या घटनेत पादचारी दांम्पत्यासह मुलगी जखमी झाली असून अपघातानंतर चालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. अधिक तपास हवालदार पथवे करीत आहेत.