नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाविद्यालय तरूणाने आपल्या प्रेयसीचे अश्लिल फोटो सोशल मीडियातून व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असून प्रेयसीने शरिरसंबधास नकार दिल्याने या तरुणाने हे कृत्य केले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विनयभंगासह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन बंजारा (२५ रा.नंदूरबार) असे अश्लिल फोटो व्हायरल करणा-या संशयित प्रियकराचे नाव आहे. टाकळीरोड भागात राहणा-या २२ वर्षीय महाविद्यालयीन पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असून त्यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमप्रकरण आहे. या प्रेमप्रकरणात संशयिताने तरूणीचे अश्लिल फोटो काढले होते. त्यानंतर तो सातत्याने शरिरसंबधाची मागणी करू लागल्याने तरूणीने त्यास खडसावले होते. गेल्या पाच महिन्यात त्याने आपली मागणी लावून धरल्याने त्रस्त झालेल्या तरूणीने त्यास नकार दिल्याने ही घटना घडल्याचे बोलले जाते. शरिर संबधात नकार दिल्याने संतप्त संशयिताने इन्स्टाग्राम या सोशल साईडच्या माध्यामातून अश्लिल फोटो आणि अश्लिल मॅसेज युवतीच्या कुटुंबियांना तसेच मित्र परिवारामध्ये व्हायरल केले. अधिक तपास निरीक्षक दिलीप ठाकूर करीत आहेत.