नाशिक : उज्जैन येथून बेकायदेशीर तलवारी आणणा-या तीन जणांना पोलिसांनी गजाआड करुन त्यांच्याकडून सात तलवारी जप्त केल्या आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपूल अनिल मोरे (२८),चेतन रमेश गंगवाणी (२६) व गणेश राजेंद्र वाकलकर (२२ रा. तिघे शितळादेवी चौक,काझीगडी अमरधामरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयित विपूल मोरे याच्या घरात धारदार तलवार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मोरे याच्या घरावर छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. त्याने घरात लपविलेल्या चार तलावरी काढून दिल्या. पोलिस तपासात त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने उज्जैन येथून तलवारी आणल्याची कबुली देत त्यांच्याकडेही काही तलवारी असल्याची माहिती दिल्याने पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेत त्यांच्या घराची झडती घेतली असता गंगवाणी याच्या घरात एक तर वाकलकर याच्या घरात दोन अशा सात हजार रूपये किमतीच्या सात धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. संशयितांसह तलवारी भद्रकाली पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आल्या असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अंमलदार रविंद्र बागुल,प्रदिप म्हसदे,आसिफ तांबोळी,विशाल देवरे,प्रविण वाघमारे,प्रशांत मरकड,महेश साळुंखे,आण्णासाहेब गुंजाळ व समाधान पवार आदींच्या पथकाने केली.