नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जुने नाशिक भागातील तिवंधा चौकात पार्क केलेल्या इलेक्ट्रीक स्कुटरच्या डिक्कीतून चोरट्यांनी चार्जर लंपास केले. . या चोरीची तक्रार मंदार रत्नाकर कावळे (रा.भद्रकाली देवी मंदिर,तिवंधा चौक) यांनी केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कावळे यांची एमएच १५ एच डब्व्यू १०७० या अॅथर कंपनीची इलेक्ट्रीक दुचाकी गेल्या बुधवारी (दि.७) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली होती. अज्ञात चोरट्यांनी स्कुटरची डिक्की उघडून सुमारे १५ हजार रूपये किमतीची स्कुटर चार्जर चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.