नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगेवगेळया भागात राहणा-या दोन जणांनी गुरूवारी गळाफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पहिली घटना नाशिकरोड येथील शेलार मळयात घडली. केशव रामभाऊ पवार (२९ रा.मानस अपा.जॉन अगस्तीन रोड,कॅनोलरोड) या तरूणाने गुरूवारी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पंख्यास शाल बांधून गळफास लावून घेतला होता. भाऊ अर्जुन पवार यांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत. दुसरी घटना पंचवटीत घडली. भक्ती संदिप भुसारे (रा.आवास अपा.आपला महाराष्ट्र कॉलनी) या युवतीने गुरूवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून किचनमधील छताच्या अॅगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत.