नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- द्वारका भागात बनावट चावीच्या सहाय्याने बंद घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी सुमारे ७० हजार रूपये किमतीचा तीन पदरी राणीहार लंपास केले. या चोरीप्रकरणी मिना रमेश बधान (रा.समर्थ कृपा, चेतना हॉस्पिटल मागे अनुसया नगर) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बधान कुटुंबिय १७ जुलै ते ३० ऑगष्ट दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बधान यांच्या बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून हॉलमधील सोफ्यात ठेवलेला सुमारे ७० हजार रूपये किमतीचा तीन पदरी राणी हार चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.