नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाघाडी परिसरात उघड्यावर जुगार खेळणा-या टोळक्यावर कारवाई करत पोलिसांनी २ हजार ७०० रूपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. मंगेश जाधव,अंकुश भुजड,शिवा वैद्य,सोनू भोंडवे,हितेश ननावरे अशी संशयित जुगारींची नावे आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मिकनगर येथील सैलानी बाबा शेजारी काही युवक उघड्यावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि.२) सायंकाळी छापा टाकला असता संशयित टोळके पोलिसांच्या हाती लागले. पैसे लावून पत्यांवर अंदर बाहर नावाचा जुगार ते खेळत होते. संशयितांच्या ताब्यातून २ हजार ७०० रूपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस कर्मचारी कल्पेश जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक गुंबाडे करीत आहेत.