नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबईस्थित एकाने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हॉटसअपवर संदेश पाठवून पीडीतेस त्रास दिल्याचा प्रकारही समोर आला आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि माहिती अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिव्हीयन साल्वॅडोर डायस (३० रा.साकिनाका,अंधेरी) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताने शहरातील महिलेचा नंबर मिळवून संपर्क साधला. गेल्या काही महिन्यांपासून संशयिते फोन कॉल करून तसेच व्हॉटसअपवर संदेश पाठवून पीडीतेस त्रास देत आहे. व्हिडीओ कॉलवर संपर्क साधून त्याने महिलेस वैयक्तिक आणि खासगी प्रश्न विचारले. याबरोबरच इंटरनेटद्वारे ऑनलाईन पाठलाग केल्याने महिलेने पोलिसाकडे आपबिती कथन केली होती. मात्र न्याय न मिळाल्याने तिने कोर्टात धाव घेतल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.