नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अल्पवयीन थोरल्या मुलीचा विनयभंग करुन धाकटीवर बलात्कार करणा-याविरुध्द अंबड पोलिस ठाण्यात विनयभंग, बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ४५ वर्षीय परिचीतास अटक करण्यात आली आहे. कृष्णा उर्फ किशोर संतू गुंबाडे (रा.म्हाडा कॉलनी,चुंचाळे) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पती पासून विभक्त झाल्याने महिला आपल्या दोन मुलींसह राहते. कारखान्यात काम करून आपला उदनिर्वाह भागविणा-या महिलेचा २०१७ मध्ये संशयिताशी परिचय झाला. या ओळखीतून त्याचे महिलेच्या घरी येणे जाणे होते. महिला मुलींचा विश्वास संपादन करीत वेळोवेळी कुटुंबियास आर्थिक मदत करू लागल्याने संशयिताचा महिलेच्या घरात कुटुंबप्रमुखासारखाच वावर होता. वडिलांप्रमाणेच महिलेसह मुलींची देखभाल तो करीत होता. महिला कामावर गेली की तो तिच्या घरी फेरफटका मारून अल्पवयीन मुलींची चौकशी करीत होता. या काळात त्याने थोरल्या १६ वर्षीय मुलीशी अंगलट करीत वेळोवेळी विनयभंग केला. तर १५ वर्षीय धाकट्या मुलीस घरात कुणी नसतांना मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केला. ही बाब मुलींनी आपल्या आईकडे कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.