नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अंबड लिंक रोडवरील डीजीपीनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यासह गृहपयोगी वस्तु असा ३३ हजाराच्या ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कावेरी अशोक गांगुर्डे (रा. वनश्रीकॉलनी,डीजीपीनगर २) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गांगुर्डे कुटुंबिय १३ ते २५ ऑगष्ट दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेला सोन्याचांदीचे दागिणे, टीव्ही व सिलेंडर असा सुमारे ३३ हजार २०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खतेले करीत आहेत.