नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -२० वर्षीय तरूणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात घडली आहे. आदित्य शंभूनाथ सरोज (रा.घरकुल एमआयडीसी,दत्तनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. आदित्य याचे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सरोज याने सोमवारी (दि.२९) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.