नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील वेगवेगळया भागातून दोन मोटारसायकली चोरीस गेल्या आहे. याप्रकरणी इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना नाशिकरोड भागात घडली. माडसांगवी ता.जि.नाशिक येथील दीपक बाळू सोनवणे हे गेल्या शुक्रवारी (दि.२६) नाशिकरोड भागात आले होते. शिवम कॉम्प्लेक्स येथील पुनम पावभाजी हॉटेल समोर त्यांनी आपली प्लॅटीना एमएच १५ जीडब्ल्यू ०९२० पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत. दुसरी घटना वडाळागावात घडली आहे. शोएब एकबाल पटेल (रा.अलिशान सोसा.रजाचौक) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ डीजे ७५१५ गेल्या शनिवारी (दि.२७) त्यांच्या सोसायटीच्या समोर लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बरेलीकर करीत आहेत.