नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहिल्याबाई होळकर चौकात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत घरासमोर खेळणारा चार वर्षीय चिमुरडा जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बालकाचा डावा पाय मोडला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा बालाजी शेळके (रा.शिवाजीनगर,गंगापूर शिवार) असे संशयित दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ईश्वर भारमल चव्हाण (रा.अहिल्याबाई होळकर चौक,गजानन महाराज मंदिरापाठीमागे गंगापूर शिवार) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण यांचा चार वर्षीय मुलगा मयूर हा गेल्या रविवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास अहिल्याबाई होळकर चौकात आपल्या घरासमोर खेळत असतांना हा अपघात झाला. भरधाव अॅक्टीव्हाने त्यास जोरदार धडक दिली. या अपघातात मयूरचा डावा पाय मोडला असून त्याच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार शेळके याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक सरनाईक करीत आहेत.