नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खडकाळी सिग्नल भागात रस्त्याने पायी जाणा-या तरूणाची वाट अडवून दोघा भामट्यांनी दमदाटी करीत मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली. ऋषीकेश संजय जाधव (१९ रा. राका कॉलनी) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. जाधव आपल्या गावी गेला होता. गेल्या शुक्रवारी (दि.२६) रात्री तो गावावरून परतत असतांना ही घटना घडली. द्वारका येथून शालिमारच्या दिशेने तो पायी जात असतांना ही घटना घडली. खडकाळी सिग्नल भागातील कपड्यांच्या दुकानाजवळ त्यास अज्ञात दुकलीने अडवित ही लुटमार केली. दोघा भामट्यांनी जाधव याचा हात पकडून दमदाटी करीत त्याच्याकडील महागडा मोबाईल हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोहिते करीत आहेत.