नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -जेएमसीटी कॉलेज परिसरात किरकोळ कारणाचा जाब विचारत टोळक्याने एकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुंबईनाक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाज शेख व त्याचे मित्र अशी चाकू हल्ला करणाºया संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अर्शान इलियास शेख (२० रा.रेहनुमा शाळेजवळ,वडाळारोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. अर्शान शेख हा सोमवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास जेएमसीटी कॉलेज परिसरातील रोडी हॉटेल जवळ उभा असतांना नवाज शेख व त्याच्या काही मित्रांनी त्यास गाठले. यावेळी फरहान कडे माझ्याविषयी वाईटसाईट बोलतो असा जाब विचारत टोळक्याने अर्शान यास शिवीगाळ व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. याप्रसंगी टोळक्यातील एकाने चाकूने अर्शान शेख याच्या मांडीवर वार केले असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.