सिडकोत घरफोडी; रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरट्यांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३३ हजाराच्या ऐवज लंपास केल्याची घटना सिडकोतील विजयनगर भागात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुंडलीक निवृत्ती निसरड (रा.खोडीयार माता चौक,विजयनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. निरसड कुटुंबिय रविवारी (दि.२८) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली १५ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३३ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार परदेशी करीत आहेत.
लोखंडी रॅक आणि ड्रम चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या लोखंडी रॅक आणि ड्रम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. अशोक रामभाऊ जगताप (रा.जुने आडगाव पोलिस ठाणे मागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप औद्योगीक वसाहतीतील नाशिक फोर्जिंग या कंपनीत काम करतात. गेल्या शुक्रवारी (दि.२६) रात्री अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या कंपाऊंडचा पत्रा उचकवून ही चोरी केली. प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या तीन लोखंडी रॅक आणि दोन लोखंडी ड्रम असा सुमारे सहा हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.