नाशिक : नाशिकरोड येथील दत्तमंदिर भागात राहत्या घरात चक्कर येवून पडल्याने ५१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमिता किशोर चंद्रमोरे (रा.रामनगर सोसा.दत्तमंदिर) असे मृत महिलेचे नाव आहे. उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चंद्रमोरे या रविवारी (दि.२८) दुपारी अचानक आपल्या राहत्या घरात चक्कर येवून पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ बिटको हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.राहूल पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.