नाशिक : रविवार कारंजा भागातील तांबट गल्लीत पत्नीची तक्रार करण्यासाठी आलेल्या तरूणास घराबाहेर जाण्याचा सल्ला दिल्याने संतप्त तरूणाने वृद्दास मारहाण केल्याची घटना घडली. संशयित तरूणास पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश सुर्यकांत काजळे (३१ रा.साई श्रध्दा पार्क,कृषीनगर जॉगिंग ट्रॅक समर्थनगर) असे संशयिताचे नाव आहे. तांबटलेन मधील ६१ वर्षीय वृध्दाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रविवारी (दि.२८) सकाळच्या सुमारास वृध्द आपल्या घरात असतांना संशयिताने कुठलेही कारण नसतांना घरात प्रवेश केला. यावेळी त्याने वृध्दात तुमच्या पत्नी विषयी तक्रार करायची आहे असे म्हटल्याने वृध्दाने त्यास घराबाहेर जाण्याचा सल्ला दिला. यावेळी संतप्त तरूणाने शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत वृध्दास मारहाण केली. संशयितास पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुरवाडे करीत आहेत.