नाशिक :महामार्गावरील बळी मंदिर परिसरात देवदर्शनासाठी मंदिरात गेलेल्या वृध्द महिलेच्या गळयातील सोन्याची पोत भामट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना घडली. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमन पोपट खैरे (७० रा.त्रिमुर्ती नगर,हिरावाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खैरे या गेल्या बुधवारी (दि.२४) नेहमीप्रमाणे दुपारच्या सुमारास देवदर्शनासाठी महामार्गास लागून असलेल्या बळी मंदिरात गेल्या होत्या. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ३० हजार रूपये किमतीचा पोत हातोहात लांबविली. अधिक तपास पोलिस नाईक माळवाळ करीत आहेत.