नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली गावातील म्हसोबा मंदिर परिसरातील शांती संकुल येथील दुकान फोडून चोरट्यांनी चांदीच्या गणपती मुर्तीसह गल्यातील रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीची गायत्री माधवदास बैरागी (रा.अनुराधा थेअटर मागे,ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैरागी यांचे हे दुकान असून गेल्या २८ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी बंद गाळयाचे शटर वाकवून दुकानातील चांदीची मुर्ती,गल्यातील रोकड आणि महत्वाचे कागदपत्र असा सुमारे पाच हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक बेग करीत आहेत.