लोखंडी अँगल चोरी करण्याचा प्रयत्न; दोघांना अटक
नाशिक : टाकळीरोड भागात शेताला कुंपन म्हणून लावलेले लोखंडी अॅगल चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड केलले आहे. या दोघांना चोरी करत असतांना शेतमालकाने पकडले. त्यानंतर दोघांना पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. राकेश आण्णासाहेब शिंदे (मुळ रा. लोणी जि.नगर हल्ली काठेगल्ली सिग्नल) व बाळू राजा पवार (मुळ रा.कळंब उस्मानाबाद हल्ली मुंबईनाका सर्कल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी भारत देवराम काठे (रा.काठेमळा,टाकळीरोड) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काठे यांची टाकळीरोड भागात शेतजमीन असून आपल्या क्षेत्रातच ते वास्तव्यास आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी आपल्या शेतजमीनीस लोखंडी अॅगलचा वापर करून वॉल कंपाऊंड तयार केलेले असून ते चोरी करतांना दोघे फिरस्ते मिळून आले. गुरूवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास काठे आपल्या शेतीस फेरफटका मारत असतांना संशयित घरापासून काही अंतरावर अँगल खोलतांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून नऊ फुट लांबीचे अॅगल हस्तगत करण्यात आले असून त्यांना चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.
२६ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक : २६ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना देवळाली कॅम्प भागात घडली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रूपेश रामदास अंबेलकर (रा.जुनी स्टेशनवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. अंबेलकर याने गुरूवारी (दि.२५) रात्री आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाब देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.