नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव गावात टेक्सटाईल्सचे दुकान फोडून चोरट्यांनी रोकडसह सुमारे ७५ हजार रूपये किमतीचे कपडे लंपास केले आहे. त्यात साडी, घागरे आणि रेडिमेड कपड्यांचा समावेश आहे. या चोरी प्रकरणी सिमा अमोल मते (रा.महालक्ष्मी गार्डन समोर, आडगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मते यांचे आडगाव गावात ओम मंदाकिनी टेक्सटाईल्स नावाचे कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे शटर वाकवून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी गल्यातील ८०० रूपयांची रोकड आणि कपडे असा सुमारे ७५ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात १४ घागरे,३० साड्या,दहा जिन्स,आठ शर्ट,दहा टी शर्ट आणि रेनकोटचा सामावेश आहे. अधिक तपास जमादार अरूण पाटील करीत आहेत.