नाशिक : पाथर्डी शिवारात दोन घरफोड्यामध्ये चोरट्यांनी सुमारे दीड लाखाच्या ऐवज लंपास केले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली घटना महामार्गावरील सेवन हेवन हॉटेल भागात घडली. अनमोल नयनतारा गोल्ड संकुल मधील अमृत सुधाकर पाखले यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाखले कुटूंबिय सोमवारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅचलॉक तोडून बेडरूममधील कपाटातून सुमारे ८७ हजार रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले. दुसरी घटना पाथर्डी रोडवर घडली आहे. या चोरीप्रकरणी राधा प्रदिप सरदार (रा.ग्रेस टॉवर अपा.सदाशिवनगर) यांनी तक्रार दिली आहे. सरदार कुटुंबिय गेल्या गुरूवारी सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून सुमारे ७३ हजार ५०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेले. दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सय्यद व निरीक्षक वांजळे करीत आहेत.