नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -बनावट कागदपत्राच्या आधारे दुस-याची मालमत्ता स्व:ताच्या नावावर करणा-या सिन्नरच्या दोघांविरूध्द उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण आनंदा भोसले व हौसाबाई आनंदा भोसले (रा.दोघे गुरूकृपा सुपर मार्केट,मेनरोड सिन्नर) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी घनश्याम प्रभाकर देशमुख (६८ रा.बोरीवली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. देशमुख यांच्या आगरटाकळी येथील गट नं.३५ – २ (अ) आणि ३५ – २ (ब) या मिळकतींचे संशयितांनी ८ जून २०१६ ते २५ एप्रिल २०२२ दरम्यान बनावट कागदपत्र तयार करून सदर मिळकतीस स्व:ता वारस असल्याबाबत नोंदी लावून घेतल्या. सदर मिळकती स्वत:च्या नावे करून घेतल्याने हा प्रकार समोर आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.