नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद रोड भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ६४ वर्षीय वृध्द चालकाचा मृत्यू झाला. पोपट ज्ञानेश्वर पिंगळे (रा.चांदशी शिवार,म.बाद रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पिंगळे गेल्या शनिवारी (दि.१३) मखमलाबाद गावाकडून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. मानकर मळा येथील खंडेराव मंदिर परिसरात भरधाव दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना आडगाव नाका येथील सदगुरू हॉस्पिटल येथे दाखल केले असता बुधवारी (दि.२४) उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार रोकडे करीत आहेत.