नाशिक : अंबड औद्योगीक वसाहतीत उन्नती इंजिनिअर कारखान्यातून कामगारानेच आपल्या साथीदाराच्या मदतीने कॉपरचे पार्ट चोरी केली आहे. ही घटना सिसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली आहेत. कारखान्यातील स्टोअर रूममधून दोघांनी तब्बल ६५ हजार रूपये किमतीचे कॉपरचे पार्ट चोरून नेले. या चोरीप्रकरणात अंबड पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. सिध्दार्थ नारायण दामोदरे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहे. याप्रकरणी लक्ष्मण पांडूरंग जुंद्रे (रा.प्रशांतनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. जुंद्रे यांचा अंबड औद्योगीक वसाहतीत उन्नती इंजिनिअर नावाचा कारखाना असून, संशयित कंपनीतील कामगार आहे. १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान लागून सुट्या आल्याने कंपनी बंद असल्याची संधी साधत संशयिताने एका साथीदाराच्या मदतीने स्टोअर रूममधील सुमारे ६५ हजार रूपये किमतीचे कॉपरचे पार्ट चोरून नेले.