नाशिक : अशोका मार्ग भागात रस्त्यावरील खड्यामुळे ४० वर्षीय दुचाकीस्वारास प्राण गमवावा लागला आहे. भावेश किशोर कोठारी (४० रा.राज अपा.बिगबाजार शेजारी ना.रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर त्यांना बेशुध्द अवस्थेत पोयनियर हॉस्पिटल येथे दाखल केले होते. पण, शनिवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत समजेलली हकीकत अशी की, कोठारी गेल्या गुरूवारी क्रोमा शोरूम पाठीमागून अशोका मार्गाच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पायोनियर हॉस्पिटल समोर भरधाव दुचाकी खड्यात आदळल्याने कोठारी रस्त्यावर पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने कानातून रक्त येत होते. अधिक तपास पोलिस नाईक बिरारी करीत आहेत.
			








