नाशिक : महाविद्यालयीन तरुणीला अश्लिल संदेश पाठविण्या-या विरुध्द सायबर पोलिस ठाण्यात विनयभंगासह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या महाविद्यालयीन तरूणीला वेगवेगळ्या क्रमांकावरुन हे संदेश पाठवले जात होते. त्यामुळे शहरातील १८ वर्षीय महाविद्यालयीन तरूणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या जुलै महिन्यापासून तरूणीचा मोबाईल नंबर मिळवित अनोळी विविध क्रमांकावरून सोशल साईटवर पाठलाग केला हात आहे. प्रारंभी तरूणीने त्याकडे दुर्लक्ष केले मात्र हा प्रकार वाढला. त्यातच अश्लिल संदेश आणि व्हिडिओ पाठविण्यात आल्याने युवतीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.