काठे गल्ली भागात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
नाशिक : द्वारका परिसरातील काठे गल्ली भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोख रकमेसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश चिंतूदास पराते (रा.पुर्वा अपा. जैन स्थानकजवळ गणेशनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पराते कुटुंबिय मंगळवारी (दि.१६) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅचलॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड आणि अलंकार असा सुमारे २ लाख ५० हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
……
मांडणीवर ठेवलेल्या डब्यातील दागिणे चोरट्यांनी केली
नाशिक : गंगापूररोडवरील संतकबीरनगर भागात उघड्या घरात शिरून चोरट्यांनी मांडणीवर ठेवलेल्या डब्यातील दागिणे लंपास केले. याघटनेत मंगळसूत्र आणि कर्ण फुले असा ९५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. या चोरीची सोनल स्वप्निल भालेराव (रा.कुर्ला मुंबई हल्ली.संतकबीरनगर,भोसला स्कूल मागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या गुरूवारी (दि.११) ही घटना घडली. भालेराव या अल्पशा कामासाठी शेजारी गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून किचनमधील स्टीलच्या डब्यात ठेवेले मंगळसूत्र आणि कर्ण फुले असा ९५ हजार रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक मोहिते करीत आहेत.