नाशिक : अंबड लिंक रोड भागात गाळामालक आणि भाडेकरुला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गोकुळ रामदास दातीर (रा.दातीरमळा,अंबड) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश, इरफान सय्यद व अन्य पाच ते सहा जण अशी संशयित मारहाण करणा-यांची नावे आहेत. या घटनेत दगड फेकून मारल्याने दातीर जखमी झाले आहे. दातिर यांचा अंबड लिंकरोडवरील आरपी स्विटजवळ गाळा असून तो उदय ठाकूर यांना भाडेतत्वावर व्यवसायासाठी दिला आहे. मंगळवारी सायंकाळी दातीर आपल्या गाळयाकडे गेले असता संशयितांनी भाडेकरू ठाकूर यांना अज्ञात कारणातून मारहाण करीत होते. यावेळी दातीर ठाकूर यांच्या मदतीला धावून गेले असता ही घटना घडली. संतप्त टोळक्याने ठाकूर यांच्यासह दातीर यांनाही शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.