नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात चक्कर आणि पोट दुखीने एका कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या कैद्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. संतोष सदू भिल (बंदी क्र.११४५२) असे मृत बंदीवासाचे नाव आहे. भिल हे गेले काही दिवस आजारी होते. पोट दुखीने ते त्रस्त असतांना अशक्तपणामुळे चक्कर येऊ लागल्याने कारागृहात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. परंतू औषधोपचारानंतरही त्यांच्या प्रकृर्तीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे रविवारी (दि.१४) भिल यांना जेल रक्षक अनिल वाघ यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतांना त्याच दिवशी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. पोलिस दप्तरी याबाबत मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक छाया वाघ करीत आहेत.