नाशिक : हनुमानवाडीतील रामनगर येथे किरकोळ कारणातून शेजारी राहणा-या तीन जणांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वर उत्तम मोरे (रा.मोरेमळा,हनुमानवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत त्रिकुटाने लाकडी दांडक्यासह फरशीच्या तुकड्याचा वापर केल्याने तरूण गंभीर जखमी झाला असून संशितांमध्ये महिलेचा समावेश आहे. हितेश, समिर दुसींग व ज्योती नामक महिला अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे शेजारी असून सार्वजनिक रस्त्यात चेंबरचे काम केल्याने हा वाद झाला. गेल्या शुक्रवारी टोळक्याने मोरे यांना गाठून रस्त्यातील चेंबर बांधकामाच्या कारणातून वाद घातला यावेळी संतप्त हितेशने शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने तर इतरांनी फरशीच्या तुकड्यांनी मारहाण केल्याने मोरे जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक झनकर करीत आहेत.