नाशिक – सातपुर येथील प्रबुद्ध नगर भागात घरात घूसून एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित संतोष चारोस्कर याला पोलिसांनी गजाआड केले आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. संशयित आणि पीडिता एकाच भागातील रहिवाशी आहे. पंधरा वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून संशयिताने हे क्रूत्य केले. घरात घूसून संशयिताने बळजबरीने बलात्कार केला. कुटुंबिय घरी परतल्यावर मुलीने आपल्या आईकडे झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलिस स्थानकात तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे.