नाशिक – वाघाडी नदी किनारी अंदर – बाहर जुगार खेळणा-या चार जणांना पोलिसांनी अंदर करुन गजाआड केले आहे. या चारही जणांकडून पोलिसांनी रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत केले असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोटू निंबा जगताप,कुशल गणेश चव्हाण,अविनाश पितांबर चौरे (रा.तिघे बुरूडवाडी,वाल्मिकनगर) व कोमल अरूण शेख (रा.मजूरवाडी सोसा. वाल्मिकनगर) अशी अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत. बुरूडवाडी भागातील वाघाडी नदी किनारी काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१५) दुपारी छापा टाकला असता संशयित हाती लागले. पत्यांच्या कॅटवर संशयित पैसे लावून अंदर बाहर जुगार खेळतांना मिळून आले. त्यांच्या अंगझडतीत सुमारे एक हजार ५०० रूपयांची रोकड मिळून आली असून शिपाई अंबादास केदार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक डी.पी.नाईक करीत आहेत.