नाशिक : ओढा स्टेशन जवळ लाखलगाव शिवारात राहणा-या ३९ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. बाबू बबन जाधव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जाधव यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जाधव यांनी रविवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच भाऊ सुनिल जाधव यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार लोहकरे करीत आहेत.