नाशिक : शहरात वेगवेगळय़ा भागात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी म्हसरूळ आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. याद्वारे चोरट्यांनी थेट नाशिक पोलिसांनाच आव्हान दिले आहे. तर, नाशिककरांनी याबाबत तीव्र नाराजी असून गुन्ह्यांचा छडा लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.
पहिली घटना दिपालीनगर भागात घडली. विकास पंकज सोनवणे (रा.वैष्णवी अपा.विनयनगररोड,वडाळा पाथर्डीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रोकडे कुटुंबिय गेल्या शनिवारी (दि.६) रात्री अमृतधाम भागात राहण-या मित्राकडे जेवणासाठी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कुटुंबिय बाहेर गेल्याची संधी साधत बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिणे असा ५० हजार ६०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात १५ हजार ५०० रूपयांची रोकड सोन्याचांदीचे दागिणे मोबाईल,आणि हेडफोनचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.
दुसरी घटना पेठरोड भागात घडली. प्रकाश किसन चौधरी (रा.शिवकलश रो बंगलो,मेघराज बेकरी मागे इंद्रप्रस्थ नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि.१०) चौधरी कुटुंबिय बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ९ हजाराची रोकड, सोन्याचांदीचे दागिणे एलईडी टिव्ही, गॅस सिलेंडर तसेच तांब्याचा हंड्डा असा सुमारे ३० हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दोन्ही घटनांप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात वेगवेगळे घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरे व हवालदार भोज करीत आहेत.
तिसरी घटना मखमलाबाद येथे घडली. या घरफोडी प्रकरणी निलेश कालिदास खांदवे (रा.श्यामसत्व अपा.थेटेमळा) यांनी तक्रार दिली आहे. खांदवे कुटुंबिय बुधवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा खांदवे यांच्या घराचे कुलूप उघडून बेडरूममधील कपाटातून सुमारे १ लाख २४ हजार ८०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. त्यात सोन्याची पोत, मंगळसुत्र, अंगठ्या, कानातले तसेच लहान मुलांच्या दागिण्यांचा समावेश आहे.